मावळ,प्रतिनिधी- महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी मावळ व मंडळ कृषि अधिकारी काळेकॉलनी यांच्या मार्गदर्शना खाली पवन मावळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजने अंतर्गत भातपिक यांत्रिकीकरन प्रकल्प राबविला जात आहे. सध्या प्रकल्प अंतर्गत घेण्यात आलेले प्रात्यक्षिक प्लॉट जोमदार आलेले असून भात पीक जोमात आहे.काही ठिकाणी थोडया फार प्रमाणात करपा,कडा करपा,पाने गुंडळणारी, तपकीरी तुडतुडे, केसाळ अळी दिसू लागल्याने मावळ कृषी विभागाच्या वतीने पवनमावळ परिसरात आज भात संशोधन केंद्र वडगाव येथील शास्त्रज्ञ डॉ. संदीप कदम हे पवन मावळ भागात भात पिकावरील कीड व रोगाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी करुंज ,काले ,जवन ,शिलिंब,
उर्से,बेबडडोहळ, चांदखेड गावात प्रत्यक्ष यांत्रिकीकरण भातपिक प्रात्यक्षिक प्लॉट व भात चारसूत्री प्लॉट वर जाऊन पाहणी करून शेतकरी बांधवांना किड व रोग उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले .