द मिडिया टाइम्स डेस्क
गणेश उत्सवाच्या या विटंबनेला थांबवायला हवं. हा उत्सव थांबवून चालणार नाही तर नाही अशा प्रकारचा उत्सव साजरा केला जाऊ नये.
स्वरूप बदलायला हवं. देश बदलायला निघालेत पहिल्यांदा बिघडलेली संस्कृती जाग्यावर आणा. नागरिकांना हक्क नक्कीच हवेत पण संस्कृती, संस्कार टिकविण्याची जसबाबादारीही घ्यायलाच हवी.
त्यासाठी बेजबाबदार लोक प्रतिनिधिनी याला प्रोत्साहित करणे थांबविले पाहिजे. काळ्या कृत्यातुन कुमार्गाने कामावलेला पैसा भविष्यात पुन्हा लोकप्रतिनिधी होण्यासाठी अशा उस्तावात बिभस्त पणे तरुण पिढीला नाचविण्यासाठी वापरणे संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. गणराया या सर्व शिशुपालांचे शंभर अपराध पूर्ण होऊनही तू असा गप्प का?